विनापरवाना रस्ता खोदल्या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा

0
1300

पिंपरी, दि. २५ (पीसीबी) – महापालिकेची परवानगी न घेता रस्ता खोदल्या प्रकरणी पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि. 24) रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास क्रोमा शोरूम समोर पिंपरी येथे घडली.

सुनील अनिरुद्ध वाघ (वय 48, रा. चऱ्होली), नितीन रमेश रासकर (वय 40, रा. बुरुडे वस्ती, हवेली), सचिन उर्फ राहुल व्यंकट साळुंखे (वय 32, रा. भोसरी), सिद्धेश्वर धनराज गोरडे (वय 32, रा. देहूगाव), परमेश्वर अनंतराव गोरडे (वय 28, रा. चाकण) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार संदीप शेळके यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी महापालिकेची परवानगी न घेता क्रोमा शोरूम समोर पिंपरी येथे रस्ता खोदला. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना रस्त्याने येण्या जाण्यासाठी बाधा निर्माण झाली. तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.