विनापरवाना फटाके विक्रीसाठी ठेवल्याने दुकानदारावर गुन्हा दाखल

0
72

देहूरोड, दि. 23 (पीसीबी) : दुकानामध्ये विनापरवाना फटाके विक्रीसाठी ठेवल्याने दुकानदारावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई सोमवारी (दि. 21) दुपारी तीन वाजताच्या सुमारास मामुर्डी येथील न्यू अग्रवाल ट्रेडर्स या दुकानात करण्यात आली.

महेश प्रेमप्रकाश अगरवाल (वय 42, रा. देहूरोड) असे गुन्हा दाखल झालेल्या दुकानदाराचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार बाळासाहेब विधाते यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महेश अग्रवाल यांचे मामुर्डी येथे न्यू अग्रवाल ट्रेडर्स नावाचे दुकान आहे. त्यांनी दुकानामध्ये विक्रीसाठी फटाके ठेवले. त्यांनी फटाके विक्रीबाबत कोणतीही परवानगी घेतली नाही. तसेच सुरक्षेची काळजी घेतली नाही. याबाबत माहिती मिळाल्यानंतर देहूरोड पोलिसांनी कारवाई करत 79 हजार 166 रुपये किमतीचे फटाके जप्त केले. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.