विनापरवाना जनावरांची वाहतूक दोघांवर गुन्हा दाखल

0
25

चाकण, दि. 08 (पीसीबी)

विनापरवाना बेकायदेशीरपणे जनावरांची वाहतूक केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 7) सकाळी 11 वाजताच्या सुमारास चाकण येथील बैल बाजारात करण्यात आली.

नीरज गुलाब निगडे (वय 28), समीर रमेश गराडे (वय 30, रा. नांदगाव, ता. मुळशी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार संतोष फटांगरे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नीरज आणि समीर यांनी विनापरवाना दोन बैल कोणत्याही चारापाण्याची सोय न करता दाटीवाटीने एका वाहनात भरले. जनावरांची वाहतूक करण्याबाबत त्यांच्याकडे कोणताही परवाना नसताना त्यांनी बेकायदेशीरपणे वाहतूक केली. याबाबत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.