विनापरवाना जनावरांची वाहतूक; तिघांवर गुन्हा

0
223

चाकण, दि. १९ (पीसीबी) :विनापरवाना जनावरांची वाहतूक केल्याप्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 17) डायमंड चौक, चाकण येथे करण्यात आली.

समीर अकबर बुबेरे (वय 35, रा. वांगणी, ता. अंबरनाथ, जि. ठाणे), एक महिला, दशरथ दत्तू निरगुडा (वय 42, रा. बेडीसगाव, ता. कर्जत, जि. रायगड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार महेश कोळी यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी त्यांच्या ताब्यातील पिकप मध्ये एक लाख 84 हजार रुपये किमतीची जनावरे दाटीवाटीने बांधली. पिकप मध्ये जनावरांच्या चारापाण्याची व्यवस्था केली नाही. तसेच त्यांच्याकडे जनावरांच्या वाहतुकीचा परवाना नसतानाही त्यांनी वाहतूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.