विनापरवाना जनावरांची वाहतूक; दोघांवर गुन्हा दाखल

0
279

खेड, दि. २८ (पीसीबी) – विनापरवाना जनावरांची वाहतूक केल्याप्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 27) दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील रोहकल रोडवर करण्यात आली.

समाधान गोकुळ पवार (वय 22), सत्यम शांतीलाल चव्हाण (वय 25, दोघे रा. शिंगणे पारगाव, ता. आंबेगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार अशोक दिवटे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी समाधान आणि सत्यम यांनी त्यांच्या ताब्यातील पिकप (एमएच 04/जीआर 5928) मध्ये दोन बैलांना रस्सीने बांधून त्यांची वाहतूक केली. जनावरे वाहतूक करण्यासाठी आरोपींनी कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नाही. तसेच जनावरांची वाहतूक करत असताना पिकप मध्ये त्यांच्या चारापाण्याची सोय केली नसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.