विनापरवाना गॅस विक्री प्रकरणी दोघांवर गुन्हा; एकास अटक

0
247

शासनाची परवानगी न घेता गॅस विक्री केल्या प्रकरणी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 22) सायंक पावणे नऊ वाजताच्या सुमारास काळेवाडी येथे करण्यात आली.

विजय बालाजी भोसले (रा. थेरगाव), शंकर नखाते (रा. रहाटणी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. विजय भोसले याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार भगवंता मुठे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विजय याने धोकादायकपाने घरगुती वापराच्या मोठ्या सिलेंडर मधून लहान सिलेंडर मध्ये गॅस चोरून काढला. त्याच्याकडे गॅस विक्री अथवा रिफिलिंग बाबत कोणताही परवाना नसताना त्याने हे काम करून ग्राहकांची व शासनाची फसवणूक केली. आरोपी शंकर नखाते याने त्याची जागा बेकायदेशीर गॅस रिफिलिंगसाठी उपलब्ध करून दिली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.