विनाकारण दुचाकीस्वारास बेदम मारहाण; एकास अटक

0
381

वाकड, दि. ८ (पीसीबी) – दुचाकी वरून जाणा-या एका व्यक्तीला विनाकारण कारमधून आलेल्या एका व्यक्तीने मारहाण केली. यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ही घटना मंगळवारी (दि. 6) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास कडाचीवाडी येथील एचपी पेट्रोल पंपाजवळ घडली.

महेश शहादेव पटेकर (वय 28, रा. आदर्श नगर कॉलनी, वाकड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सुनील रामा गायकवाड (वय 38, रा. कडाचीवाडी, चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे दुचाकीवरून घरी जात होते. ते एचपी पेट्रोल पंपा जवळ आले असता त्यांच्या पाठीमागून एका कारमधून आरोपी आला. त्याने फिर्यादी यांना आवाज देऊन गाडी थांबवण्यास सांगितले. फिर्यादी हे थांबले असता गाडीतील व्यक्तीने गाडीतून उतरून लाकडी दांडक्याने फिर्यादी यांना बेदम मारहाण केली. यामध्ये फिर्यादी गंभीर जखमी झाले. त्यानंतर आरोपी पळून गेला. पोलिसांनी तपासचक्रे फिरवत अवघ्या काही तासांमध्ये आरोपीला अटक केली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.