विनाकारण तरुणास मारहाण; एकास अटक

0
351

कार्यालयासमोर थांबलेल्या तरुणाला शिवीगाळ करून सिमेंटच्या गट्टूने मारहाण करण्यात आली. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. ही घटना रविवारी (दि. 16) रात्री साडेआठ वाजता पिंपळे सौदागर येथे घडली.

अनिकेत संतोष भालेराव (वय 20, रा. पिंपळे सौदागर) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ओमकार दत्तात्रय काटे (रा. पिंपळे सौदागर) याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या कार्यालयासमोर थांबले असताना आरोपी तिथे आला. ‘तुझे इथे काय काम आहे’ असे म्हणत फिर्यादीस शिवीगाळ केली. रस्त्याच्या बाजूला पडलेला सिमेंटचा गट्टू फिर्यादी यांना मारून त्यांना जखमी केले. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.