विनाकारण एकास बेदम मारहाण; भांडण सोडविण्यास गेलेल्या दोघांनाही मारहाण

0
68

चाकण,दि. 13 (पीसीबी)

विनाकारण एका व्यक्तीला बेदम मारहाण केली. हे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या दोघांनाही मारहाण झाली. ही घटना शनिवारी (दि. 12) रात्री पावणेदहा वाजताच्या सुमारास मेदनकरवाडी चाकण येथे घडली.

संदीप अरुण शिंदे (वय 46, रा. मेदनकरवाडी, चाकण) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमर राठोड (रा. मेदनकरवाडी, ता. खेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अमर याने विनोद हरिभाऊ कारले (वय 45, रा. मेदनकरवाडी, चाकण) यांना विनाकारण काठीने डोळ्यावर, कपाळावर, पायावर मारून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. हे भांडण सोडविण्यासाठी फिर्यादी संदीप शिंदे गेले. त्यावेळी आरोपीने संदीप यांच्या हाताच्या बोटाला चावा घेऊन त्यांना जखमी केले. तसेच दगडाने डोक्यात मारले. शिवेगाळ करत आरोपीने संदीप यांना जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच एक महिला देखील भांडण सोडविण्यासाठी आली असता त्या महिलेला मारहाण करून तिचे मंगळसूत्र तोडून नुकसान केले. मी या ठिकाणचा दादा आहे. जर कोणी माझ्या नादाला लागाल तर मी एकेकाला जीवे मारून टाकीन, अशी आरोपी अमर याने धमकी दिली. आरोपीच्या दहशतीने नागरिकांनी आपली घरे बंद केली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.