विनयभंग प्रकरणी रिक्षा चालकावर गुन्‍हा

0
99


भोसरी, , दि. २० (पीसीबी) : रिक्षाच्‍या भाड्याचे सुट्‌टे पैसे देण्‍याच्‍या कारणावरून झालेल्‍या भांडणात रिक्षा चालकाने महिलेला मारहाण करीत तिचा विनयभंग केला. ही घटना २९ ऑगस्‍ट रोजी दुपारी साडेतीन वाजताच्‍या सुमारास भोसरी बसस्‍टॉप येथे घडली.

याप्रकरणी रिक्षा चालक शंकर गव्‍हाळे (पूर्ण नाव, पत्‍ता माहिती नाही) याच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केला आहे. याबाबत शास्‍त्री चौक, आळंदी रोड, भोसरी येथे राहणार्‍या ३२ वर्षीय महिलेने भोसरी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, २९ ऑगस्‍ट रोजी दुपारी साडेतीन वाजताच्‍या सुमारास फिर्यादी महिलेचे आरोपी रिक्षा चालक शंकर गव्‍हाळे याच्‍याशी रिक्षा भाड्याच्‍या सुट्‌ट्या पैशावरून भांडण झाले. त्‍यावेळी आरोपीने फिर्यादी महिलेला मारहाण करीत तिचा विनयभंग केला. तसेच यावेळी फिर्यादी यांच्‍या गळ्यातील दोन तोळ्याचे मंगळसूत्र पडून गहाळ झाले तसेच मोबाइलही फुटला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.