विनयभंग प्रकरणी तरुणास अटक

0
176

महिलेच्या घरात जाऊन तिच्याशी गैरवर्तन केल्या प्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना सोमवारी (दि. 24) दुपारी पावणे तीन वाजताच्या सुमारास एमआयडीसी भोसरी परिसरात घडली.

गौरव राजू वाळूंज (वय 23, रा. एमआयडीसी भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 31 वर्षीय पिडीत महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला तिच्या घरी असताना आरोपीने महिलेच्या घरी आला. त्याने महिलेसोबत गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. त्यानंतर महिलेचे तोंड व गळा दाबून तिच्या गळ्याला व हातांना ओरखडले. घडलेल्या प्रकाराबाबत कोणास काही सांगितले तर जिवंत सोडणार नाही, अशी आरोपीने धमकी दिली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.