विनयभंग प्रकरणी एकास अटक

0
514

निगडी, दि. २१ (पीसीबी) – ऑफिसमध्ये घुसून महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही घटना शनिवारी (दि. 20) दुपारी पूजा क्लासिक, संभाजी चौक, आकुर्डी येथे घडली.

किसान भानुदास शेळवणे (वय 40, रा. अजंठानगर, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह त्याच्या पत्नी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि त्यांचे पती त्यांच्या ऑफिसमध्ये असताना शनिवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास आरोपी तिथे आले. त्यांनी फिर्यादी यांच्या पतीसोबत वाद घातला. त्यावेळी आरोपींना समजावून सांगत त्यांना ऑफिसच्या बाहेर काढत असताना आरोपी किसन याने फिर्यादी यांच्याशी गैरवर्तन करून त्यांचा विनयभंग केला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.