विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा

0
142

दि. १९ ऑगस्ट (पीसीबी) पिंपरी
घरात घुसून एका महिलेचा विनयभंग केला. आरोपी विरोध केला असता त्याने पिडित महिलाव व तिच्या आई-वडीलांना शिवीगाळ केली. ही घटना बौद्धनगर, पिंपरी येथे रविवारी (दि. 18) सायंकाळी सव्वासात वाजताच्या सुमारास घडली.

रवि लक्ष्मण सोनवणे (रा. बौद्धनगर, पिंपरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 30 वर्षीय महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी सव्वासात वाजताच्या सुमारास फिर्यादी या घरात झोपून टीव्ही पाहात होत्या. त्यावेळी तिथे आलेल्या आरोपी रवि सोनवणे याने महिलेचा विनयभंग केला. पिडित महिलेने त्यास विरोध करीत याबाबत जाब विचारला. त्यानंतर आरोपीने फिर्यादी व तिच्या आई-वडिलांना शिवीगाळ करीत धमकी दिली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.