विनयभंगास विरोध केल्‍याने महिलेला मारहाण

0
134

दि. २० ऑगस्ट (पीसीबी ) भोसरी
विनयभंग करणार्‍यास विरोध केल्‍याने त्‍याने महिलेला लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 19) रात्री साडेअकरा वाजताच्‍या सुमारास दापोडी येथे घडली.

योगेश राजू गुंठे (रा. ममतानगर, पिंपळे गुरव) असे गुन्‍हा दाखल झालेल्‍या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका महिलेने भोसरी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, दापोडी येथील वर्कशाॅपच्‍या पाठीमागील बाजूला कोणी नाही, हे पाहून आरोपी योगेश याने महिलेचा विनयभंग केला. तू माझ्याशी लग्‍न कर, माझ्याशी बोल, नाहीतर तुला सोडणार नाही, अशी धमकी दिली. महिलेने विरोध केला असता आरोपीने तिला शिवीगाळ करीत लाथाबुक्‍क्‍यांनी पायावर तसेच पोटात मारहाण करून पळून गेला. भाेसरी पोलीस तपास करीत आहेत.