विधान परिषदेसाठी भाजपचे सोशल इंजिनिअरींग पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, सदाभाऊ खोत, अमित गोरखे यांना उमेदवारी

0
84

दि १ जुलै (पीसीबी ) महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. यामध्ये पंकजा मुंडे यांची ही एमएलसी निवडणुकीसाठी पक्षाच्या उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली आहे. भाजपकडून कऱण्यात आलेल्या घोषणेनंतर पंकजा मुंडे यांना मंत्रिपद दिलं जाईल अशीही चर्चा आता सुरू झाली आहे. विधान परिषदेसाठी भाजपकडून ५ नावं जाहीर केली आहे. या नावांमध्ये पंकजा मुंडे, डॉ.परिणय फुके, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर आणि अमित गोरखे यांची नावं असून त्यांना विधान परिषदेवर संधी दिली आहे.

गेल्या ५ वर्षांपासून पंकजा मुंडे यांचा राजकीय वनवास सुरु होता. पंकजा मुंडे यांनी वारंवार आपली उघड नाराजी व्यक्त केली होती. पण लोकसभा निवडणुकीत त्यांना भाजप पक्षाकडून खासदारकीचं तिकीट देण्यात आलं. या माध्यमातून भाजप पंकजा यांना देशाच्या राजकारणात सक्रीय करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत होती. पण लोकसभेत पराभव झाल्याने पंकजा यांचं काय होणार? याबाबत चर्चा सुरु होत्या. या चर्चांदरम्यान आता पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर उमेदवारी दिली आहे.