विधान परिषदेच्या ५ जागांसाठी ‘या’ नावांची जोरदार चर्चा

0
72

मुंबई: विधानसभा निवडणुकानंतर रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या ५ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून सध्या शिवसेनेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या जागांसाठी जोरदार लॉबिंग सुरू आहे. येत्या २७ मार्चला या पाच जागांसाठी निवडणूक होणार आहे. यात भाजपच्या ३ आणि शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या खात्यात असलेल्या प्रत्येकी एक जागेवर कोणाची वर्णी लागणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

विधान परिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी २७ मार्च रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून त्यासाठीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. यात महायुतीमधील भाजपचे तीन, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाच्या प्रत्येकी एक जागा रिक्त आहेत. या जागांसाठी ही निवडणूक होणार असून शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून या जागांसाठी जोरदार लॉबिंग सुरू आहे.

यांची नावे चर्चेत ?

सध्या विधान परिषदेच्या पाच जागा रिक्त झाल्या आहेत. आता या जागांवर शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्र‌वादी अजित पवार गटाकडून जोरदार प्रयत्न होताना दिसतात. शिवसेनेत रवींद्र फाटक, शीतल म्हात्रे आणि चंद्रकांत रघुवंशी यांची नावे चर्चेत आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे झिशान सुिदिकी, संग्राम कोते पाटील आणि आनंद परांजपे यांची नावे चर्चेत आहेत.