विधानसभेत सगळेच खोक्याभाई भरलेत

0
14

मुंबई, दि. २३ पीसीब – आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून मुंबईत काही नव्या पदरचना करण्यात आल्या आहेत, यावेळी बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी चौफेर फटकेबाजी केल्याचं पाहायला मिळालं. मनसेच्या पदाधिकारी बैठकीत राज ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला. एक खोक्याभाई काय घेऊन बसला आहात. विधानसभेत सगळेच खोक्याभाई भरलेत, मुळ विषय राहातात बाजुला, तुम्हाला भलत्याच विषयांमध्ये भरकटून टाकलं जात आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

मनसेच्या पदाधिकारी बैठकीत बोलताना राज ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. एक खोक्याभाई काय घेऊन बसला आहात, अख्खी विधानसभाच भरली आहे. विधानसभेत सगळे खोक्याभाईच भरले आहेत. मुळ विषय राहतात बाजूला तुम्हाला भलत्याच विषयांमध्ये भरकटून टाकलं जात आहे, असं यावेळी राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान येत्या काही दिवसांमध्ये महापालिका निवडणुका लागू शकतात असे संकेत मिळत आहेत. राजकीय पक्षांकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झाली आहे. मनसेनं देखील आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही नव्या पदरचना केल्या आहेत. मनसे नेते संदीप देशपांडे हे मनसेचे मुंबईचे शहराध्यक्ष असणार आहेत. तर अमित ठाकरे यांच्यावर शाखाध्यक्षांची जबाबदारी देण्यात आली आहे.

याबाबत बोलताना राज ठाकरे यांनी म्हटलं की, मुंबईमध्ये काही नव्यानं पदरचना आम्ही केल्या आहेत. त्याच्यामध्ये पहिल्यांदाच मुंबईला शहराध्यक्ष आणि उपशहराध्यक्ष पद देण्यात आलं आहे. आतापर्यंत पक्षात फक्त विभागाध्यक्ष हे पद होतं. आता शहराध्यक्ष आणि उपशहराध्यक्ष हे पद देखील असणार आहे. कोणी -कोणी काय-काय करायचं हे मी आता त्यांना दोन एप्रिलला सांगणार आहे. काय -काय काम कारायचं आहे, कोणत्या गोष्टी करायच्या आहेत. कोणत्या चौकटीमध्ये काम करायचं आहे. या सगळ्या गोष्टी त्यांना लेखी स्वरुपात देण्यात येणार आहेत, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.