विधानसभा निवडणुकांसाठी नव्या चेहऱ्यांना संधी – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
84

दि. ५ ऑगस्ट (पीसीबी) – आगामी विधानसभा निवडणुकांसाठी नव्या चेहऱ्यांना संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे, असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले आहे. आज बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा उत्साहात पार पडला. यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित केलं. सर्वांशी मनमोकळा संवाद साधला.

महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. राज्याच्या कानाकोपऱ्यात विकास पोहोचवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वचनबद्ध आहे. त्यासाठी आम्ही सर्वजण नेटानं आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडत आहोत.

राज्य सरकारनं घेतलेल्या वीजमाफीचा लाखो शेतकऱ्यांना फायदा झाला. महिलांना प्रपंच करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ते ध्यानी ठेऊनच त्यांच्यासाठी सन्मानानं काहीतरी करायचा आमचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीकोनातून पावलं उचलली जात आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकांसाठी नव्या चेहऱ्यांना संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. इतरांना ही संधी दिली गेली पाहिजे. लोकसभा निवडणुकीत शहरी आणि ग्रामीण भागात ज्या-ज्या बुथवर कमी पडलो, तिथे काही आवश्यक बदल करावे लागणार आहेत. संघटनेत सुद्धा बदल केले जातील.