विधानसभा निवडणुकांचा निकाल हा महायुतीच्या बाजूनेच येणार

0
12

– मोदी चौथ्यांदा पंतप्रधान होतील

मिरा-भाईंदर, दि. १८ (पीसीबी) : : महाराष्ट्रात आगामी काळात पार पडणाऱ्या विधानसभा निवडणुकांचा निकाल हा महायुतीच्या बाजूनेच येणार आहे. परंतु, त्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे, असे वक्तव्य पद्मविभूषण रामभद्राचार्यजी महाराज यांनी मंगळवारी भाईंदरमध्ये केले. श्री गंगोत्री उत्तर भारतीय भवन भूमिपूजन कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली होती. यावेळी ते बोलत होते.

मिरा-भाईंदर मध्ये वास्तव्य असलेल्या उत्तर भारतीय समाजासाठी मिरा रोडच्या पूनम गार्डन भागातील ‘श्री गंगोत्री उत्तर भारतीय’ नावाने भवन उभारले जात आहे. हे भवन उभारण्यासाठी लागणारी जागा व त्यासाठी येणारा खर्च स्वतः आमदार गीता जैन करणार आहेत. या भवनाचा भूमिपूजन कार्यक्रम मंगळवारी दुपारी पार पडला. यावेळी रामभद्राचार्यजी महाराज यांनी प्रमुख उपस्थिती लावली होती.

यावेळी बोलताना ते म्हणाले, की गीता जैन यांनी मागील निवडणूक अपक्ष लढत जिंकली होती. यावेळी त्या महायुतीच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवतील. त्यासाठी ज्या व्यक्तीशी बोलायचंय त्याच्याशी मी स्वतः बोलणार आहे. जर, त्यांना तिकीट मिळालं नाही. तर, अपक्ष म्हणून निवडणूक लढवून जिंकतील. तसेच तदनंतर महायुतीला पाठिंबा ही दर्शवतील असे देखील रामभद्राचार्यजी महाराज म्हणाले.
मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्री गिरगाव चौपाटीवर, जागा वाटपाबाबत काय म्हणाले?

भूमिपूजन झालेल्या भवनाचे काम पूर्ण झाल्यानंतर उद्घाटनाला मी पुन्हा हजेरी लावणार असल्याचे देखील ते म्हणाले. यावेळी त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच ते माझ्याप्रमाणे शंभर पूर्ण करतील आणि देशाचे चौथ्यांदा पंतप्रधान देखील होतील, असा विश्वास देखील व्यक्त केला.