पिंपरी, दि. २९ – पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा दादू बनसोडे यांची महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल भव्य नागरी सत्कार सोहळा आज शनिवार २९ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी त्याबाबतचे प्रसिध्दीपत्र दिले आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील सर्व आजी माजी खासदार, आमदार, व महायुतीचे सर्व पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. स्वागत सोहळ्यापूर्वी रावेतच्या मुकाई चौकात त्यांचे जोरदार स्वागत होणार असून तेथून रॅली निघणार आहे.
*स्वागत व रॅलीची सुरुवात मुकाई चौक, रावेत येथून होईल. स्वागत रॅली मार्ग असा आहे.
निगडी भक्ती शक्ती स्मारक व अण्णाभाऊ साठे स्मारक येथे पुष्पहार अर्पण.
खंडोबा मंदीर, आकुर्डी येथे पुष्पहार अर्पण.
चिंचवड स्टेशन येथे लहूजी वस्ताद, स्मारकास पुष्पहार अर्पणपिं.चिं. मनपा भवन, येथे कै.अण्णासाहेब मगर, स्मारकास पुष्पहार अर्पण.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक, पिंपरी येथे पुष्पहार अर्पण आणि रॅलीचा समारोप स्वागत समारंभाने होणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकामागे, मुंबई-पुणे हायवे लगत, पिंपरी येथे नागरी सत्काराचे नियोजन आहे. सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन बहल यांनी केले आहे.
सोहळा संपल्यानंतर चिंचवड स्टेशन, काकडे रेसिडन्सी येथे रात्री ८ वाजता त्यांचे स्वागत होणार आहे.