दि . २८ ( पीसीबी ) – मुळा नदी सुधार प्रकल्पाच्या विरोधात रविवारी पिंपळे निलख येथे मोठे जनआंदोलन झाले होते. आंदोलकांच्या मागण्यांची दखल घेत
विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी नदी सुधार प्रकल्पाचे सुरू असलेले काम त्वरीत थांबविण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना दिले होते. प्रत्यक्षात जेसीबी, पोकलेन आणि मजुरांकरवी हे काम आजही अखंडपणे सुरू असल्याचे चित्र सामाजिक कार्यकर्ते संतोष माचुत्रे यांनी प्रत्यक्ष जागेवर पाहणी करून लक्षात आणून दिले. विधानसभा उपाध्यक्ष बनसोडे यांच्या आदेशालाही आयुक्तांनी जुमानले नाही. बनसोडे यांच्या पत्राला सरळ केराची टोपली दाखविल्याची चर्चा सुर आहे.