विधानसभा अध्यक्षपदी पुन्हा राहुल नार्वेकर, शिवसेना-राष्ट्रवादीला ठेंगा

0
30

मुंबई, दि. 07 (पीसीबी) : विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभा अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. त्यासाठी उद्या म्हणजेच रविवारी उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहेत. विधानसभेचे अध्यक्षपद आपल्याला मिळावे अशी इच्छा शिवसेना शिंदे गट आणि अजित पवारांनी व्यक्त केली होती. पण भाजपने हे पद आपल्याकडेच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय अध्यक्षपदाचा उमेदवार कोण असेल हे ही निश्चित केले आहे. महायुतीचा उमेदवार उद्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करणार आहे. विरोधकांनी जर उमेदवार रिंगणात उतरवला तर अध्यक्षपदाची निवडणूक होईल.

दरम्यान, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून या पदावर सर्वात जेष्ठ आमदाराची शिफरस करण्यात आली होती मात्र, भाजपने ठेंगा दाखवला असे समजले. भाजपने अध्यक्षपदासाठी उमेदवार कोण असावा हे निश्चित केल्याचे समजत आहे. भाजपनं पुन्हा एकदा राहुल नार्वेकर यांनाच विधानसभेचे अध्यक्ष करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नार्वेकर हे रविवार अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करतील असं सुत्रांकडून समजत आहे. या आधीही नार्वेकर यांनी विधानसभा अध्यक्ष म्हणून काम पाहीले आहे. त्यांच्याच काळात शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फूटीनंतर आमदार अपात्रतेचा निकाल त्यांनी दिला होता. आता पुन्हा एकदा त्यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची सुत्रं येण्याची शक्यता आहे.

दरम्यान अध्यक्षपदाबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील असे स्वत: राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे. पक्षात अनेक सक्षम नेते या पदासाठी आहे हे सांगायला ही ते विसरले नाहीत. भाजपने या आधी ही आपल्याला न मागता खूप काही दिलं आहे. त्यामुळे यापुढे ही पक्ष जी जबाबदारी देईल ती आपण पार पाडू असेही ते म्हणाले. त्यामुळे नार्वेकरांनी विधानसभा अध्यक्षपदाची दुसरी इनिंग खेळण्याची तयारी दाखवली आहे.

विरोधकांनी आजा आमदारांच्या शपथविधीवर बहिष्कार टाकला होता. असं इतिहासात प्रथमच घडत असल्याचे नार्वेकर म्हणाले. जनतेच्या मतदानाचा हा अवमान आहे असं ही ते म्हणाले. संसदीय लोकशाहीला अशोभनीय असे हे काम आहे. सहा महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीत मविआचा विजय झाला. त्यावेळी अशी मागणी का केली नाही असा प्रश्नही यावेळी नार्वेकर यांनी उपस्थित केला. ज्या आमदारांना राजीनामा द्यायचा आहे त्यांनी अध्यक्षांकडे द्यावा असंही ते म्हणाले. शिवाय ईव्हीएम बाबत राहुल गांधी मैदानात उतरले आहेत. त्यावरही नार्वेकर म्हणाले ते जिथे जातात तिथे आम्हाला फायदा होतो असंही ते म्हणाले.