विद्यृत कार्यालयात ओसामा बिन लादेनचा फोटो

0
267

फारुखाबाद,दि. १ (पीसीबी) : नवाबगंजमधील विद्युत विभागाच्या कार्यालयातील एक फोटो सध्या चर्चेचा विषय ठरलाय. हा फोटो दहशतवादी ओसामा बिन लादेनचा आहे. या फोटोच्या माध्यमातून ओसामा बिन लादेनचं जगातील सर्वोत्कृष्ट कनिष्ठ अभियंता असं वर्णन करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.

विशेष म्हणजे, एसडीओ नवाबगंज यांच्याशी याबाबत बोललं असता, त्यांनी हा फोटो स्वत: कार्यालयात लावल्याचं मान्य केलंय. त्याचबरोबर कोणीही कोणालाही आदर्श मानू शकतो, असंही त्यांनी सांगितलंय. मात्र, हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कार्यालयातून काढून टाकण्यात आलाय.