विद्या भारती पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या अध्यक्षपदी डॉ. अरुण कुलकर्णी यांची निवड

0
212

पुणे, ता. २६ (पीसीबी) – नाशिकच्या भोसला सैनिकी शाळेचे माजी प्राचार्य डॉ. अरुण कुलकर्णी यांची विद्या भारती, पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या अध्यक्षपदी निवड झाली. कर्वे नगर येथील सरस्वती विद्यामंदिर येथे झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत डॉ. कुलकर्णी यांची निवड करण्यात आली. अध्यक्षपदाचा कार्यकाल २०२२ ते २०२५ असा तीन वर्षांचा असेल.

संस्थेचे मावळते अध्यक्ष अनिल महाजन आणि पश्चिम क्षेत्राचे मंत्री शेषाद्री डांगे यांनी डॉ. कुलकर्णी यांचे स्वागत केले. “सकारात्मक काम लोकोपर्यंत पोहचवणे आणि पदाच्या गुणवत्तेची परंपरा पुढे चालू ठेवणे, यासाठी सर्वांच्या मदतीने प्रयत्न करेन,” असे कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले.

यावेळी कार्यकारीणीची पुनर्रचना करण्यात आली. कार्यकारीणी सदस्य म्हणून रघुनाथ देविकर, अच्युत कुलकर्णी, दादासाहेब काजळे, प्रगती भावसार, शिरीश नाईकरे, रेखा जगदाळे, कचेश्वर साळुंखे यांची निवड करण्यात आली. अ‍ॅड. सुवर्णा पुराणिक आणि अ‍ॅड. राजीव मराठे यांनी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.

“पश्चिम महाराष्ट्र प्रांतातील विविध शैक्षणिक संस्थांशी संल्गनता वाढवण्यावर भर द्यावा,” असे आवाहन शेषाद्री डांगे यांनी केले. तसेच, नवीन शैक्षणिक धोरणासंदर्भात समाजात जागृती करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
सभेमध्ये संस्थेच्या संघटनात्मक कार्याबद्दल विचार विनिमय करुन; आगामी कार्ययोजना आखण्यात आली.