विद्यार्थ्याला आठ जणांकडून विनाकारण मारहाण

0
290

चाकण, दि. ७ (पीसीबी) – विनाकारण गावातील आठ ते नऊ जणांनी 19वर्षीय विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जखमी केले आहे. हा प्रकार चाकणजवळील दत्तवाडी येथे मंगळवारी (दि.3) घडला आहे.

याप्रकरणी किशोर नवनाथ आवटे (वय 19रा. दत्तवाडी, शेलगाव) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून प्रशांत जालींदर आवटे, प्रणव जालिंदर आवटे,सुरजजालिंदर आवटे,निरंजन अशोक आवटे, आकाश जालिंदर आवटे, योगेश धोंडीबा आवटे, अक्षयगजानन आवटे व दिलखिश एकनाथ आवटे (सर्व राहणार, शेलगाव) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी यांना काहीही काराण नसताना आरोपींनी शिवीगाळ करत हाताने व लाथाबुक्क्यानेमारहाण करत जखमी केले आहे. ज्यामध्ये त्यांच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले आहे.याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.