विद्यार्थ्याबरोबर वर्गातच डान्स करताना शिक्षिकेचा व्हिडीओ तुफान व्हायरल

0
165

सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडीओ तुफान व्हायरल होईल ते सांगता येत नाही. अनेकदा शाळा किंवा कॉलेजमधील शिक्षकांचे शाळेत शिकवतानाचे काही व्हिडीओ व्हायरल होतात. कधी शिक्षक विद्यार्थ्यांना तालासुरात कविता शिकवताना दिसतात, तर कधी शिक्षिका मुलांसोबत डान्स करताना दिसतात. आतादेखील असाच एक व्हिडीओ खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात विद्यार्थी आणि शिक्षिका एकमेकांसोबत डान्स करताना दिसत आहेत. पूर्वीच्या शालेय जीवनात आणि आताच्या शालेय जीवनात खूप जमीन आस्मानाचा फरक आहे. पूर्वी विद्यार्थी शिक्षकांसोबत बोलायलादेखील घाबरायचे, पण हल्लीचे विद्यार्थी शिक्षकांसोबत मजामस्ती करताना दिसतात. शिवाय सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे शाळेतील शिक्षकदेखील विद्यार्थ्यांसोबत रिल्स बनवताना दिसतात.

मागील काही दिवसांपूर्वी एका कॉलेजमधील असाच एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता, ज्यात शिक्षिका ‘कजरा रे’ गाण्यावर डान्स करताना दिसली होती. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. दरम्यान, आता एक शिक्षिका विद्यार्थ्यासोबत ‘आशिकी २’ चित्रपटातील गाण्यावर रोमँटिक डान्स करताना दिसत आहेत. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, कॉलेजमधील एका वर्गात फेयरवेल पार्टी साजरी केली जात आहे, यावेळी वर्गात सजावटदेखील केल्याचे दिसत आहे. यावेळी एक विद्यार्थी शिक्षिकेसोबत ‘आशिकी २’ चित्रपटातील ‘तुम ही हो’ या गाण्यावर रोमँटिक डान्स करताना दिसत आहे. यावेळी वर्गातील इतर विद्यार्थीदेखील या दोघांकडे कौतुकाने पाहताना दिसत आहेत. या व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर खूप चर्चा रंगली आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडियावरील @kushal_m.j या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर आतापर्यंत जवळपास १४ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाल्या असून सात लाखांहून अधिल लाइक्स मिळाल्या आहेत. या व्हिडीओवर युजर्सदेखील अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत. त्यातील एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, “शाळेचे मुख्याध्यापक कॅमेऱ्यातून पाहत असतील”, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “लकी विद्यार्थी, लकी शिक्षिका”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “माझी शाळा अशी का नाही.” तर एका युजरने लिहिलंय की, “आमच्यावेळी अशा शिक्षिका नव्हत्या.” तर आणखी एका युजरने लिहिलंय की, “आमचे हे स्वप्न आता स्वप्नच राहणार.”