- विद्या भारती – शैक्षणिक क्षेत्रातील मूल्ये आणि संस्कार टिकवण्यास कटीबद्ध
चिंचवड दि. 09 (पीसीबी) – विद्या भारती या शिक्षणक्षेत्रात काम करणाऱ्या महत्वपूर्ण संघटनेची बैठक शहरातील नॉव्हेल शाळेतील सभागृहात दि.८ डिसेंबर रोजी संपन्न झाली. कार्यक्रमास विद्या भारतीचे प्रांत अध्यक्ष डॉ. अरुण कुलकर्णी, शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान असलेले विधानपरिषदेचे आमदार अमित गोरखे, विद्या भारती चे प्रांत मंत्री रघुनाथ देविकर , संघाचे जिल्हा कार्यकर्ते शैलेश कुलकर्णी हे उपस्थित होते.
या प्रसंगी बोलतांना आमदार अमित गोरखे म्हणाले, शिक्षण क्षेत्र हा समाजाचा पाया आहे. शिक्षणाचा दर्जा उंचावला की उत्तम माणूस घडतो. उत्तम माणसचं देश टिकवू शकतात आणि घडवू शकतात. तेव्हा विद्या भारती च्या कार्याला माझ्या शुभेच्छा आहेत. माझ्या कडून मी सर्वोतोपरी सहकार्य हे परिवारातील संघटन उभारणीसाठी नेहमी करेन. प्रांत अध्यक्ष डॉ.कुलकर्णी यांनी , विद्या भारती 1952 पासून दर्जेदार शिक्षण देत आहे आणि भारतीयांच्या मूल्ये आणि संस्कृतीनुसार तरुण पिढीला शिक्षित करण्यासाठी वचनबद्ध असल्याचे सांगून तरुण पिढीला भारतीय मूल्य आणि संस्कृतीनुसार शिक्षण देण्याची कला मानणाऱ्या काही बांधिलकी आणि देशभक्त लोकांनी 1952 मध्ये गोरखपूर, यूपी येथे पहिली शाळा सुरू केली. त्यांनी या शाळेचे नाव सरस्वती शिशु मंदिर-देवी सरस्वतीचे मंदिर असे ठेवले. मुलांना त्यांच्या आवेशाने, समर्पणाने आणि मेहनतीमुळे इतर ठिकाणीही अशाच शाळा सुरू झाल्या. उत्तर प्रदेशात अशा शाळांची संख्या झपाट्याने वाढली. त्यांच्या योग्य मार्गदर्शनासाठी आणि नियोजनबद्ध विकासासाठी 1958 मध्ये राज्यस्तरीय शिशू शिक्षा प्रबंध समितीची स्थापना करण्यात आली. सरस्वती शिशू मंदिरांमध्ये चांगले शिक्षण आणि योग्य संस्कारांमुळे समाजात ओळख, सन्मान आणि लोकप्रियता मिळाली. इतर राज्यांत शिशुमंदिरांचा प्रसार होऊ लागला आणि काही वर्षांतच अनेक शाळा स्थापन झाल्या. विविध प्रांतातील कारभाराचे व्यवस्थापन करण्यासाठी राज्यस्तरीय समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.
यावेळी विद्या भारती पिंपरी चिंचवड शहर कार्यकारिणी ही मान्यवरांच्या उपस्थितीत घोषित करण्यात आली.
अध्यक्ष : डॉ. अशोकजी नगरकर
उपाध्यक्ष : डॉ. लक्ष्मीकांत अत्रे
उपाध्यक्ष : सौ. अश्विनी अमोल गोरखे
जिल्हा मंत्री – प्रवीण शंकरराव पोळ
जिल्हा सह मंत्री – सौ. लीना वर्तक
कोषाध्यक्ष – सौ. श्वेता कुंभार
जिल्हा आरोग्य विभाग प्रमुख – डॉ. शिवलीला पाटील
जिल्हा क्रीडा विभाग प्रमुख – दिनेश देशमुख
जिल्हा योग विभाग प्रमुख – सौ. चेतना नंदकर
जिल्हा सोशल मीडिया विभाग प्रमुख – सौ. भैरवी नाझरकर
जिल्हा कार्यकारिणी सदस्य : नितीन जामदार
देहू गट संयोजक – सौ. दिपाली सहस्त्रबुद्धे
देहू गट सह संयोजक – सौ. सुजाता कुलकर्णी
सांगवी गट संयोजक – अतुल दौंडकर
हिंजवडी गट संयोजक – सौ. मयुरी वायगुडे पाटील
पिंपरी चिंचवड चे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. अशोक नगरकर यांनी, पुढील काळात आपण शहरातील सर्व शाळांशी संपर्क करून शिक्षक, पालक, संस्था चालक यांना संघटनेशी जोडून त्यांच्या रुची आणि अनुभवा नुसार कामामध्ये समाविष्ट करून
करून घेणार असल्याचे बोलतांना सांगितले.
विद्या भारती सोबत जोडून घेण्यासाठी 9730270000 यावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाला शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.