हिंजवडी, दि.02 (पीसीबी)
बेकायदेशीरपणे विदेशी दारू विक्री केल्याप्रकरणी एका तरुणाला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई ३१ डिसेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास साखरेवस्ती, हिंजवडी येथे करण्यात आली.
पुष्पेंद्र पप्पू रजक (वय २९, रा. हिंजवडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार शंकर भोईर यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साखरेवस्ती येथील एका कॉम्प्लेक्स मध्ये आरोपी पुष्पेंद्र हा दहाव्या मजल्यावर विदेशी दारू विक्री करत होता. याबाबत माहिती मिळाल्यानंतर हिंजवडी पोलिसांनी कारवाई करत पुष्पेंद्र याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून १६ हजार ९८४ रुपये किमतीची विदेशी दारू जप्त केली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.