विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा

0
365

पंढरपूर, दि. १० (पीसीबी) : महाराष्ट्र राज्याच्या प्रथेप्रमाणे आज आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा पार पडली. त्यावेळी मंदिरात भाविक उपस्थित होते. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर ही त्यांची पहिलीचं महापूजा होती. कुटुंबातील सदस्यांसोबत त्यांनी विठुरायाची महापूजा केली. आजची महापूजा करण्यासाठी निवडणूक आयोगाने काही अटी आणि शर्तीच्या आधारावरती परवानगी दिली आहे. पंढरपूरात दाखल झाल्यानंतर त्यांनी अनेक कार्यक्रमांना उपस्थिती लावली आहे. त्यानंतर त्यांनी पहाटे महापूजा केली. आषाढि_एकादशी निमित्त विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा मुख्यमंत्री व त्यांच्या सुविद्य पत्नी लता शिंदे आणि मानाचे वारकरी मुरली भगवान नवले आणि जिजाबाई मुरली नवले मु.पो. रुई, ता.गेवराई, जि.बीड यांच्या हस्ते संपन्न झाली.

मुख्यमंत्र्यांकडून पांडूरंगाला साकडं –
वारीत सहभागी झालेल्या भक्तांचे आभार मानतो. मला आज पुजा करण्याचा मला मान मिळाला. आमच्या चार पिढ्याने पुजा केली हे भाग्य सर्वांना मिळावं. पूर येऊ नये पण बळीराजा सुखी राहू दे. बळीराज्याचे संकट दूर होऊ द्या, कोरोनाचा नायानाट होऊ द्या, असं साखडं पांडूरंगाला घातल आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मीडियाशी बोलताना सांगितलं. समाजातील सर्व लोकांसाठी हे राज्य असेल. पंतप्रधानांनी सांगितले राज्यात मोठे प्रकल्प उभे करा. त्यासाठी निधी कमी पडणार नाही, आषाढी वारीचा आढावा घेतला लॉग टर्मसाठी सुधारणा व्हावी. ह्यासाठी विशेष आराखडा तयार करण्याच्या सुचना दिल्या. कायमस्वरूपी विकास करण्याच्या सुचना दिल्या आहे असंही शिंदे यांनी सांगितलं.

पूर परिस्थिती कंट्रोल करण्यासाठी मनुष्यबळ लागते –

काही जिल्ह्यात अतिवृषी झाली आहे. पूर परिस्थिती कंट्रोल करण्यासाठी मनुष्यबळ लागते. पावसाळ्यानंतर ह्या निवडणुका घ्या अशी विनंती करणार आहे. न्याय व्यवस्था हे ओबीसीला आरक्षण मिळणार आहे. आम्ही राज्य स्थापन केले आहे. कायद्यानूसार आम्ही राज्य स्थापन केले आहे. हे सरकार हे कायदेशीर आहे. हे राज्य सर्वसामन्याचे राज्य आहे. सर्वांना न्याय मिळणार आहे. जागेवर काम होईल अशी आमची इच्छा आहे. भाजपा नेत्यांची नाही तर संविधानिक पदावर असेल्या व्यक्तींची भेट घेतली. राज्याच्या विकासात केंद्रांची मदत होईल यासाठी दिल्लीत बैठक घेतली असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. 

आईवडिलांची पुण्याईने मला महापुजाचा मान मिळाला आहे. आजचा दिवस माझ्यासाठी सर्वांत महत्त्वाचा दिवस आहे. आईवडिलांची पुण्याईने मला महापुजाचा मान मिळाला आहे. सर्व सहकाऱ्यांचे मनापासून आभार मानतो. 10 लाखांपेक्षा जास्त वारकरी सहभागी झाले आहेत. राज्यातील जनेतला हे वर्ष सुखाचे जावे ही प्रर्थांना करतो असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.