विचारणा केल्यावरून एकास जेवणाच्या डब्याने मारहाण

0
83

हिंजवडी, दि. २६ (पीसीबी) : बेडचे प्लाय खाली पडल्या बाबत विचारणा केल्याने एकास जेवणाच्या डब्याने मारहाण करून धमकी देण्यात आली. ही घटना मंगळवारी (दि. 24) रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास शिंदेवस्ती, नेरेगाव येथे घडली.

अमर किसन खर्चे (वय 42, रा. शिंदेवस्ती, नेरेगाव) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मुरलीधर भास्कर खर्चे (रा. शिंदेवस्ती, नेरेगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अमर हे त्यांच्या राहत्या घरातून खाली पार्किंग मध्ये येत असताना त्यांनी ठेवलेल्या बेडचे प्लाय खाली पडले त्याबाबत आरोपी मुरलीधर यास विचारणा केली. त्याचा राग आल्याने मुरलीधर याने अमर यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच जेवणाच्या डब्याने अमर यांच्या डोक्यात व डोळ्याजवळ मारून जखमी केले. तुझ्याकडे पाहून घेतो अशी मुरलीधर याने अमर यांना धमकी दिली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.