दि . २२ ( पीसीबी ) – खळबळजनक! विक्रोळीत 36 वर्षीय महिलेची गळा चिरून हत्या केल्याचे आढळले.सुमन सूरज निर्मल असे या महिलेचे नाव असून ती आपल्या पतीसोबत विक्रोळी पूर्व परिसरात रहात होती. महिलेचा पती हा रात्रपाळी करून घरी पहाटे ५:३० वा आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. पत्नीचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह पाहून त्याने या घटनेची माहिती मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला दिली. घटनास्थळी आरोपीचा शोध घेण्यासाठी डाॅगस्काॅड, फिंगरप्रिंट आणि न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे पथक दाखल झाले आहेत. अधिक तपास विक्रोळी पोलिस करत आहेत