विक्री कर थकवल्या प्रकरणी तळवडे येथील व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल

0
55

चिखली, दि. 8 ऑगस्ट (पीसीबी) – व्यवसायाचा दोन वर्षाचा तब्बल एक कोटी 19 लाख 22 हजार 318 रुपये विक्री कर थकवल्या प्रकरणी वस्तू व सेवाकर विभागाने तळवडे येथील एका व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 12 ऑगस्ट 2014 ते 7 ऑगस्ट 2024 या कालावधीत घडला.

मेसर्स सिद्धार्थ सेल्स इंडस्ट्रीजचे प्रोप्रायटर आसुलाल एच बिष्णोई (रा. तळवडे) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी वस्तू व सेवाकर विभागातील अधिकारी शलाका शिवानंद कडणे यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेसर्स सिद्धार्थ सेल्स इंडस्ट्रीजचे प्रोप्रायटर आसुलाल एच बिष्णोई यांनी एक कोटी 19 लाख 22 हजार 318 रुपये थकबाकी व्हॅट कायद्यांतर्गत सन 2009-10 आणि 2010-11 या कालावधीचे निर्धारणा आदेश वस्तू व सेवा कर विभागाकडून पारित करण्यात आले आहेत. त्याची मागणी नोटीस सुद्धा पारित करण्यात आली आहे. मात्र बिष्णोई यांनी कराची थकबाकी अद्याप पर्यंत भरलेली नाही. वस्तू व सेवाकर विभागाने बिष्णोई यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करून देखील कराची रक्कम न भरल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.