विक्रीसाठी गुटखा व तंबाखू जवळ बाळगल्याप्रकरणी तरुणाला अटक

0
173

रावेत, दि. 11 (पीसीबी) – विक्रीसाठी तंबाखू व गुटखा जवळ बाळगल्या प्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट पाचने बुधवारी ( दि. 10) किवळे गाव येथे केली.

शकरलाल मांगीलाल देवासी (वय 20, रा. किवळे) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर गाडेकर यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी देवासी याचे किवळे येथे किराणा दुकान आहे. त्यात त्याने कोणत्याही परवानगी शिवाय तंबाखू, गुटखा, सुगंधी सुपारी असे साहित्य विक्रीसाठी ठेवले. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत त्याच्याकडून 13 हजार 326 रुपयांचा गुटखा जप्त केला. रावेत पोलीस तपास करीत आहेत.