विक्रीसाठी आणलेल्या गुटख्यासह तरुणाला अटक

0
154

पिंपरी, दि. २३ (पीसीबी) – विक्रीसाठी घेऊन आलेल्या गुटखा व तंबाखूसह एका तरुणाला महाळुंगे तो नाटक करण्यात आली आहे ही कारवाई पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट चार यांनी रविवारी दुपारी अडीच वाजता केली आहे.

अमित कुमार कमलाकांत शुक्ला (वय 35 रा. नऱ्हे पुणे) असे अटक आरोपीचे नाव आहे हिंजवडी पोलीस ठाण्यात पोलिस हवालदार प्रवीण केरभाऊ दळे यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कायद्यानुसार प्रतिबंध असताना देखील आरोपी हा त्याच्या महिंद्रा एक्स यु व्ही या गाडीमधून गुटका व तंबाखू असे एकूण 14 हजार 42 रुपयांचा मुद्देमाल विक्रीसाठी घेऊन जात होता. पोलिसांना याची खबर मिळतात पोलिसांनी कारवाई करत आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून 14 हजार रुपयांचा गुटखा तसेच 14 लाख रुपये यांची गाडी असा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.