विक्रीसाठी आणलेला गांजा अंमली पदार्थ विरोधी पथकाने पकडला

0
366

चाकण, दि. १७ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने निघोजे येथे गांजा विक्रीसाठी आलेल्या एकाला अटक केली. त्याच्याकडून एक किलो ४१८ ग्रॅम वजनाचा ३५ हजार ४५० रुपयांचा गांजा जप्त केला. ही कारवाई बुधवारी (दि. १५) दुपारी करण्यात आली.

संतोष मारुती सातपुते (वय ३२, रा. निघोजे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह अक्षय (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संतोष याने अक्षय यांच्याकडून विकण्यासाठी गांजा आणला. याबाबत अंमली पदार्थ विरोधी पथकाला माहिती मिळाली. पोलिसांनी कारवाई करून संतोषला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक किलो ४१८ ग्रॅम वजनाचा गांजा, ७३० रुपये रोख रक्कम, १० हजारांचा एक मोबाईल फोन असा ऐवज जप्त केला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.