वाहन चोरी करणाऱ्या दोघांना अटक

0
2

आठ दुचाकी जप्त

चिंचवड, दि. 15 (पीसीबी)
पिंपरी चिंचवड शहर परिसरात वाहन चोरी करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखा युनिट एकने अटक केली. त्यांच्याकडून एक बुलेट, दोन स्प्लेंडर, पाच मोपेड अशा एकूण सहा लाख 55 हजार रुपये किमतीच्या आठ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. चिखली, पिंपरी, भोसरी, चाकण, शिवाजीनगर, निगडी पोलीस ठाण्यातील नऊ वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

रफिक उमर जमादार (वय 37, रा. मोशी), निलेश मनोहर गायकवाड (वय 30, रा. चिखली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलीस उप आयुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिखली पोलीस ठाण्यात वाहन चोरीचा एक गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखेकडून केला जात होता. चिखली मधील वाहन पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार रफिक जमादार आणि निलेश गायकवाड यांनी चोरी केल्या असून त्या दुचाकी विक्री करण्यासाठी केएसबी चौक आणि एमआयडीसी ब्लॉक दोन येथे लपवून ठेवल्या असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट एकला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दोघांना अटक करत त्यांनी लपवून ठेवलेल्या नऊ दुचाकी जप्त केल्या.

ही कारवाई पोलीस निरीक्षक सुहास आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी कानडे, पोलीस अंमलदार मनोजकुमार कमले, सोमनाथ बोऱ्हाडे, महादेव जावळे, गणेश महाडिक, सचिन मोरे, प्रमोद हिरळकर, प्रमोद गर्जे, अजित रुपनवर, तुषार वराडे, तानाजी पानसरे यांनी केली.