वाहन चालकाने केला 11 लाखांच्या पार्टचा अपहार

0
141

कोंढवा, दि. २२ (पीसीबी) – एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पोहोचविण्यासाठी दिलेल्या मालाच्या 11 लाख 15 हजार रुपये किमतीच्या पार्टचा वाहन चालकाने अपहार केला. ही घटना 29 जानेवारी ते 30 जानेवारी या कालावधीत कोंढवा बुद्रुक येथील टीसीआय एक्सप्रेस कंपनीत घडली.

विनायक प्रल्हाद गोरे (रा. मोडनिंब, ता. माढा, जि. सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी शेखर मुरलीधर राक्षे (वय 39, रा. राक्षेवाडी, ता. खेड) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा बुद्रुक येथील टीसीआय एक्सप्रेस या कंपनीतून आरोपी विनायक गोरे याच्या ताब्यातील वाहनात तीन पार्ट अम्बेथान येथील कंपनीत पोहोचविण्यासाठी दिले. वाहन चालक गोरे याने त्यातील 11 लाख 15 हजार रुपये किमतीच्या एका पार्टचा स्वतःच्या फायद्यासाठी अपहार केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.