बावधन, दि.10 (पीसीबी)
वाहन कर्ज घेताना नात्यातील एका व्यक्तीला त्याच्या परस्पर जामीनदार म्हणून सांगत त्याची फसवणूक केली. त्यानंतर वाहनाचे कर्ज देखील फेडले नाही. ही घटना 10 ऑक्टोबर 2018 ते 10 डिसेंबर 2024 या कालावधीत बाणेर येथे घडली.
कुलदीपसिंग घोरी (वय 46), एक महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अमुतसिंग लालसींग गील (वय 41, रा. पिंपरी) यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कुलदीपसिंग हा फिर्यादी अमुतसिंग यांच्या आत्याचा मुलगा आहे. कुलदीपसिंग आणि एका महिलेने महिंद्रा फायनांशियल सर्विसेस लिमिटेड मधून वाहन घेण्यासाठी कर्ज घेतले. कर्ज घेताना अमुतसिंग यांच्या परस्पर त्यांचे नाव जामीनदार म्हणून दिले. तसेच त्यांच्या खोट्या सह्या करून फोटो वापरत खोटे व्हेरिफिकेशन केले. त्यानंतर महिंद्रा फायनांशियल सर्विसेस लिमिटेड कंपनीचे 13 लाख रुपयांचे वाहन कर्ज न फेडता अमुतसिंग यांची फसवणूक केली. बावधन पोलीस तपास करीत आहेत.