वाहने बाजूला करण्यास सांगितल्याने मारहाण

0
28

पिंपरी, दि. २9 (पीसीबी)
वाहने बाजूला करण्यास सांगितल्याने पाच जणांनी मिळून एका व्यक्तीला बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. २७) दुपारी दीड वाजताच्या सुमारास जामा मस्जिद समोर, खराळवाडी पिंपरी येथे घडली.

फिजोर अख्तर अब्दुलगफार सैफी (वय ३८, रा. पिंपरी) यांनी याप्रकरणी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शोहेब मुजावर, सारिख सय्यद, कमाल अन्सारी, अजमत शेख आणि अन्य एकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी फिरोज हे शुक्रवारी दुपारी नमाज पडून घरी जात होते. मस्जिद मधून बाहेर पडल्यानंतर आरोपी रस्त्यावर वाहने उभी करून थांबले असल्याचे फिरोज यांना दिसले. त्यामुळे फिरोज यांनी आरोपींना वाहने बाजूला करण्यास सांगितले. त्या कारणावरून आरोपींनी फिरोज यांना शिवीगाळ, दमदाटी करून बेदम मारहाण केली. संत तुकाराम नगर पोलीस तपास करीत आहेत.