वाहनाच्‍या धडकेत दुचाकीस्‍वाराचा मृत्‍यू

0
81

महाळुंगे, दि. २० (पीसीबी) :  पिकअप वाहनाने दिलेल्‍या धडकेत दुचाकीस्‍वाराचा मृत्‍यू झाला. ही घटना बुधवारी (दि. १८) सायंकाळी सव्‍वासात वाजताच्‍या सुमारास चिंबळी फाटा ते मोई या रस्‍त्‍यावर घडली.

जयप्रकाश छबीनाथ भारतीया (वय ४५, रा. मोशी) असे अपघातात मृत्‍यू झालेल्या दुचाकीस्‍वाराचे नाव आहे. मनोजकुमार रामअकबाल भारतीया (वय २४, रा. चिंबळी फाटा, ता. खेड, जि. पुणे) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी (एमएच १४ केए ६९८२) या पिकअप वरील अज्ञात चालकाच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, फिर्यादी मनोजकुमार यांचे चुलते जयप्रकाश हे मोईफाटा ते चिंबळी या रस्‍त्‍यावरून बुधवारी सायंकाळी दुचाकीवरून चालले होते. त्‍यावेळी भरधाव वेगात आलेल्‍या पिकअपने त्‍यांच्‍या दचाकीला धडक दिली. या अपघातात जयप्रकाश यांचा मृत्‍यू झाला. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.