वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

0
146

खेड , दि. १२ (पीसीबी) – वाहनाच्या धडकेत एका तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी (दि. 10) सायंकाळी सात वाजता खेड तालुक्यातील निघोजे येथे स्मशानभूमी रोडवर घडला.

जितेशकुमार धर्मेंद्र यादव असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी अनिलकुमार ज्ञानू वर्मा (वय 20, रा. निघोजे. ता. खेड. मूळ रा. उत्तर प्रदेश) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मित्र जितेशकुमार हा शुक्रवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास निघोजे येथे स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याने जात होता. त्यावेळी अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली. त्यात गंभीर जखमी होऊन जितेशकुमार याचा मृत्यू झाला. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.