वाहनाच्या धडकेत जखमी वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू

0
267

चाकण, दि. ३ (पीसीबी) – वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सव्वासात वाजता चाकण-वासुली फाटा रस्त्यावर भांबोली येथे घडला.

सोपान सीताराम पिंजण (वय ७०, रा. भांबोली, वासोली, ता. खेड) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी सोमनाथ सोपान पिंजण (वय ३९) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शुभम शिवाजी भोर (वय ३०, रा. भोरवाडी वडगाव कांदळी, ता. जुन्नर) असे गुन्हा दाखल झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोमनाथ यांचे वडील सोपान पिंजण हे ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सव्वासात वाजताच्या सुमारास चाकण-वासुली फाटा रस्त्याने जात होते. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या दुचाकीने (एमएच १४/जेटी ५३२५) सोपान यांना जोरात धडक दिली. यामध्ये सोपान हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.