वाहनांची तोडफोड करणाऱ्या सराईत गुंडाची पोलिसांनी काढली धिंड

0
167

पिंपरी, दि. १९ ऑगस्ट ( पीसीबी) – पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी पोलिसांनी रेकॉर्डवरील एका सराईत गाव गुंडाची मुंडन करून धिंड काढली आहे. पिंपळे गुरव परिसरातील 60 फुटी रोडवर पोलिसांनी गाव गुंडाची मुंडन करून धिंड काढली आहे.तीन दिवसांपूर्वी अक्षय राजेश खुळे या 27 वर्षाचे गावगुंडाने मद्यपान करून साठ फुटी रोडवर दगडाच्या सहाय्याने पाच-सहा चार चाकी वाहनाची तोडफोड करून मोठ नुकसान केला होता. तसेच काही नागरिकांच अंगावर दगड देखील भिरकावले होते. या सर्व घटनेमुळे साठ फुटी रोड परिसरात राहणारे नागरिक प्रचंड दहशतीखाली जगत होते. त्यामुळे नागरिकांच्या मनातील गाव गुंडाची दहशत मोडून काढण्यासाठी पोलिसांनी अक्षय राजेश खुळे या गावगुंडाची धिंड भर दिवसा रस्त्यावर धिंड काढली आहे.

पिंपरी चिंचवड शहरात वाहनांची तोडफोडीचे असंख्य प्रकार सुरू आहेत. काळेवाडी, भोसरी, प्राधिकरण, थेरगाव, पिंपरी, सांगवी, वाकड अशा अनेक भागांतून तोडफोडीचे प्रकार झाले. गुन्हेगार पकडले जातात मात्र, जेलमधून सुटले की पुन्हा तोडफोड करत असल्याचे आढळले आहे. गुन्हे घडूच नयेत म्हणून शहरात दोन वर्षांपूर्वी साडेतीन हजार सीसी कॅमेरे बसविले मात्र, अद्याप ते बंद आहेत.