वाहनचोरी करणाऱ्या सराईतास बेड्या, हिंजवडी पोलिसांची कारवाई 15 दुचाकी जप्

0
303

पिंपरी दि. २२ (पीसीबी) -वाहनचोरी करणाऱ्या सराईतास हिंजवडी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून 15 दुचाकी पोलिसांनी  जप्त केल्या आहेत.असिफ शेरखान पठाण (वय.21 रा.मुळशी, मुळ रा. मोहोळ, सोलापूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहनचोरी करणाऱ्या टोळीचा शोध हिंजवडी पोलीस घेत असताना त्यांना रामनगर, बावधन परिसरात एक इसम संशयीतरित्या फिरताना दिसला. यावेळी पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी असता त्याने उडवा-उडवीचीउत्तरे दिली. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्याने परिसरात वाहनचोरीसाठी आल्याचे सांगितले. त्याला अटक करून पोलिसांनी तपास केला असता त्याच्यावरील हिंजवडी पोलीस ठाणे येथील 2, शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील 2, सिंहगड पोलीस ठाण्यातील 2, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील 2, वारजे पोलीस ठाण्यातील 2 तर दत्तवाडी कोथरूड, चंदननगर पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे 13 गुन्हे उघड झाले आहेत. तर 2 दुचाकीची कोणतीही तक्रार अद्याप पोलिसांकडे नाही. असा एकूण 4 लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर पठाणचे दोन साथीदार नितीन पांढुरंग साबळे व अनिकेत अमर ढगे हे फरार असून यातील ढगे याच्यावर 2017 मध्ये मोका अंतर्गत बिबेवाडी पोलिसांनी कारवाईकेली होती. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.