वाहतूक पोलिसांनी पावती फाडली म्हणून पोलिसांना आरोरावी व पोलीस ठाण्यात गोंधळ

0
237

पिंपरी ,दि. 25 (पीसीबी)- वाहतूक पोलिसांनी पावती फाडली म्हणूनवाहतूक पोलिसांच्या अंगावर धावून येत सरकारी कामात अडथळा आणला तसेच पोलीस ठाण्यातहीआरडा-ओऱड करत गोंधळ घातला. यावरून भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असूनदोघांना अटक केली आहे. हा प्रकार बुधवारी (दि.24) नाशिक फाटा येथे घडला. याप्रकरणी पोलीस नाईक बाबासाहेब पाखरे यांनी भोसरीपोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अश्वदिप पोपटलाल तारळकर (वय 24 रा.भोसरी) व महिलाआरोपी यांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे दुचाकीवरूनजात असताना पोलिसांनी वाहतूकीचा नियम मोडला म्हणून त्यांच्यावर दंड आकारला यावेळीतुम्ही पावती का फाडली म्हणत आरोपींनी हुज्जत घातली. तसेच पोलीस निरीक्षकाच्याअंगावर हि धावून गेले. त्याना पुढील कारवाईसाठी पोलीस ठाण्यात नेले असता शिवीगाळकरत फोनवर शुटींग काढली व ती सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी दिली. यावरूनआरोपींवर गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढिल तपास करत आहेत.