वासुली मधून साडेतीन किलो गांजा जप्त

0
32

महाळुंगे, दि. 1३ (पीसीबी) : महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वासुली मधून तीन किलो 877 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. ही कारवाई महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी गुरुवारी (दि. 12) दुपारी केली. विभूती भीषण स्वेन (वय 35, रा. वासुली, ता. खेड. मूळ रा. ओडिशा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार अमोल माटे यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वासुली येथे राहणाऱ्या विभूती स्वेन याच्याकडे गांजा असल्याची माहिती महाळुंगे एमआयडीसी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत विभूती याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक लाख 93 हजार 850 रुपये किमतीचा तीन किलो 877 ग्रॅम गांजा जप्त केला. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.