125 वर्षांची समृद्ध परंपरा असलेली बगाड यात्रा वाल्हेकरवाडी ते ग्राम दैवत श्री काळभैरवनाथ मंदिर चिंचवड येथे बैलांच्या सह्यायाने नेली जाते
या वर्षी चा गळकरी असण्याचा मान श्ी धनंजय तान्हाजी वाल्हेकर यांना मिळाला असुन हनुमान जयंती दिवशी सराळी जन्मोत्सव मंदिरात साजरा झाल्या नंतर सर्व ग्रामस्थ व गळकरी हे ग्राम दैवतांना पानफुल करुन यात्रा सुखकर ह्वावी ही प्रार्थना केली जाते व संध्याकाळी ५ वाजता गळकरी नवरदेवाच्या पेहरावात ग्राम प्रदक्षिणा करुन हनुमंता चे दर्शन घेऊन बगाडा वर लटकुन वेताळबुवा , हनुमान मंदिर व काळभैरवनाथ मंदिर चिंचवड येथे आरती नंतर सांगता होते.
हा केवळ धार्मिक उत्सव नाही, तर गावाच्या श्रद्धेचा, एकतेचा आणि संस्कृतीचा जिवंत वारसा आहे. हनुमान जन्मोत्सवानिमित्त साजरी होणारी ही यात्रा – गळकरी, बगाड रचना, रिंगण आणि गावाचा जल्लोष – अनुभवणं ही एक अभिमानाची गोष्ट आहे.
ही परंपरा नवीन पिढीला समजावी, त्यांच्यात रुजावी, आणि नव्याने स्थायिक झालेल्यांनीही यामध्ये सहभागी व्हावे, यासाठी रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीने “परंपरा पुढील पिढीस” हा माहीती जतन करण्याचा व सर्वांसाठी जाहीर प्रसिद्ध करण्याचा विशेष उपक्रम हाती घेतला आहे.
यात्रेचा इतिहास, गळकरीची निवड, बगाडाची बांधणी, रिंगणाची माहिती यामार्फत हे वैभव नव्या मनांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे.
आपली संस्कृती, आपली जबाबदारी – पुढच्या पिढीस अभिमानाने सोपवूया!