वाल्हेकरवाडीत अतिक्रमण कारवाईचा धडाका

0
37

चिंचवड, दि. 14 (पीसीबी) : विधानसभा निवडणूक काळात मोठ्या प्रमाणावर अवैध बांधकामे झाली. आचारसंहिता उठल्यानंतर या बांधाकमांना नोटीस देण्यात आली होती आता जेसीबी लावून कारवाई सुरू करण्यात आली आहे. चिंचवड ब प्रभाग कार्यालयांतर्गत प्रभाग अधिकारी अमित पंडित यांच्या नेतृत्वाखाली वाल्हेकरवाडी येथील स्वामी विवेकानंद सोसायटी मधील तीन बांधकामांवर शुक्रवारी कारवाई करण्यात आली.

प्रभाग अधिकारी पंडित म्हणाले, निवडणूक काळात वारंवार आवाहन करूनसुध्दा लोकांनी अवैध बांधकाम केल्याचे निदर्शनास आले. पहिल्या टप्प्यात या बांधकाम मालकांना नोटीस देण्यात आली. आता पाडण्याचे काम सुरू केले आहे. काल वाल्हेकरवाडी येथील सुरू असलेल्या तीन बांधकामांवर कारवाई केली. सीमा राठोड, हरिबा जाधव आणि अमित निकम यांच्या मालकिची तीन मिळून ३०५ चौरस मीटरची बांधकामे पाडली. आता पुढचे आठवडाभर या प्रकारच्या सर्व बांधकामांवर कारवाई कऱणार आहोत.