वाल्हेकरवाडीतून दुचाकी चोरीला

0
323

वाल्हेकरवाडी, दि. १० (पीसीबी) – वाल्हेकरवाडी परिसरातून पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना शुक्रवारी (दि. 7) दुपारी सव्वाबारा ते रात्री सव्वा अकरा वाजताच्या कालावधीत घडली.

सौरभ तानाजी शिवले (वय 24, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची 20 हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच 14/ईए 6768) वाल्हेकरवाडी येथील एका इमारतीसमोर पार्क केली होती. चोरट्यांनी दुचाकीचे हॅण्डल लॉक तोडून दुचाकी चोरून नेली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.