वाल्‍हेकरवाडीतील घटनेमुळे परिसरात खळबळ

0
123

चिंचवड, दि. 17 (पीसीबी) : धारदार शस्‍त्राने पोटात भोकसून महिलेचा खून करण्‍यात आला. ही घटना बुधवारी (दि. १६) सकाळी अकरा वाजताच्‍या सुमारास लक्ष्‍मीनगर, वाल्‍हेकरवाडी, चिंचवड येथे उघडकीस आली. ज्योती नवनाथ केसकर (वय २९, रा. लक्ष्‍मीनगर, वाल्‍हेकरवाडी, चिंचवड) असे खून झालेल्‍या माहिलेचे नाव आहे.

चिंचवड पोलीस ठाण्‍याचे वरिष्‍ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी दिलेल्‍या माहितीनुसार, मयत ज्‍योती या वाल्‍हेकरवाडी परिसरातील रानजाई हॉटेलमध्‍ये कामाला होत्‍या. त्‍या मूळच्‍या मंत्‍तेवाडी, ता. निपाणी, जि. बेळगाव येथील रहिवासी असून त्‍यांचे पती व मुले गावी असतात. ज्‍योती या आपल्‍या एका मैत्रिणीसह वाल्‍हेकरवाडी परिसरात राहण्‍यास होत्‍या.

अज्ञात व्‍यक्‍तीने त्‍याच्‍या पोटात धारदार शस्‍त्राने भोकसून त्‍यांचा खून केला. त्‍यानंतर बाहेरून कडी लावून तो निघून गेला. सकाळी अकरा वाजताच्‍या सुमारास शेजारी राहणार्‍या नागरिकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. घटनास्‍थळी दाखल झालेल्‍या पोलिसांनी ज्‍योति यांना त्‍वरीत रुग्‍णालयात नेले. मात्र उपचारापूर्वीच त्‍यांचा मृत्‍यू झाल्‍याचे डॉक्‍टरांनी घोषित केले. घरातील कोणतेही मौल्‍यवान साहित्‍य चोरीला गेले नसल्‍याने हा खून चोरीच्‍या उद्‌देशाने झाला नसल्‍याचे पोलिसांचे म्‍हणणे आहे. याबाबत एका व्‍यक्‍तीवर संशय असून पोलीस त्‍याच्‍या मागावर आहेत. चिंचवड पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.